श्री समर्थ शिक्षण संस्था व्दारा संचालित श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर्षी अष्टदशकपूर्ती आनंद सोहळा साजरा करीत आहे. त्या निमित्य विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून विार्थ्यांसाठी आंतरशालेय निबंध स्पर्धा व शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये अमरावती शहरातील ४० विालयातील ७० विार्थ्यांनी सहभाग घेतला व राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विविध जिल्ह्यातील ६० शिक्षकांनी सहभाग घेतला होता. या निबंधाचे परिक्षण करण्यात आले.
आंतरशालेय निबंध स्पर्धेत कु.वैभवी विनय पंडीत, साईबाबा विद्यालय , अमरावती हि प्रथम क्रमांची मानकरी ठरली. व्दितीय क्रमांकाची मानकरी कु. समिक्षा सुनील माथुरकर, गणेशदास राठी विद्यालय , अमरावती तसेच तृतीय क्रमांकाची मानकरी कु.गार्गी ललित गणेशे,नूतन कन्या शाळा,अमरावती ही ठरली. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी श्रीमती ज्योती नारायणराव निचत, मोहनाबाई कन्या शाळा, दिग्रस, जि.यवतमाळ या ठरल्या. व्दितीय क्रमांकाचे मानकरी सौ.मंजुषा विजय करमरकर श्रीरामकृष्ण विद्यालय अमरावती या ठरल्या. तसेच तृतीय क्रमांकाचे मानकरी कु. लता रामकृष्ण जाधव ना.मा. चौधरी विद्यालय ,अकोला या ठरल्या.
या निबंध स्पर्धेचे योग्य परिक्षण डॉ.दया पांडे, सौ.मोहिंदेकर, श्री.पिहूलकर, डॉ.कल्पना देशमुख, सौ.हर्षाताई अळसपुरे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका सौ.वीणा कारणकर,श्री.देवळे, सौ.प्रिती गोसावी आणि निबंध समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विजेत्या स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.कोलवाडकर, सचिव डॉ.बोधनकर आणि मुख्याध्यापिका सौ.मंगरूळकर मॅडम यांनी अभिनंदन केले.