दि. 3,4 व 6 सप्टेंबर 2016
अहवाल
आपल्या श्री समर्थ विद्यालयाला 80 वर्ष पूर्ण झाले आहेत. म्हणून आपली श्री समर्थ शिक्षण संस्था अष्टदशकपूती आनंदसोहळा 2016 साजरा करीत आहे. या निमित्ताने भव्य अमरावती विभागीय शालेय बास्केट बॉल स्पर्धा घेण्याचे ठरले. हया स्पर्धा दि. 3,4 व 6 सप्टेंबर 2016 रोजी घेण्यात आल्या हया स्पर्धा 14, 17 व 19 वयोगटातील मुले व मुली यांच्यात घेण्यात आल्या.
दि. 3 सप्टेंबर 16 ला हया स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 11 वाजता करण्यात आले. हया स्पर्धेचे उद्घाटक म्हणून क्रीडा उपसंचालक सौ प्रतिभा देशमुख मॅडम, अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. कोलवाडकर सर, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव व संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. पुरोहीत सर, संस्थेचे सचिव डॉ. बोधनकर सर, संस्थेचे सदस्य मा. डांगे सर, महाराष्टद्य बास्केट बॉल असोशिएशन चे उपाध्यक्ष श्री देशमुख सर व शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. मंगरूळकर मॅडम हया सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हया स्पर्धेकरीता बुलढाणा, अकोला ग्रामीण,अकोला मनपा,यवतमाळ, वाशिम, अमरावती मनपा, अमरावती ग्रामीण, असे 7 मुलींचे व 7 मुलांचे संघ सहभागी झाले होते. दि. 3 सप्टेंबर 16 ला 17 वषे आतील मुलांमध्ये बुलढाणा संघ विजयी झाला तर अमरावती म.न.पा. संघ उपविजयी राहिला. तर मुलींच्या स्पर्धेमध्ये अमरावती म.न.पा. विजयी तर वाशिमचा संघ उपविजयी राहीला.
दि. 4 सप्टेंबर 16 ला 14 वर्षाआतील मुले व मुलींच्या स्पर्धा झाल्या या स्पर्धेमध्ये सुध्दा 7 मुलांचे संघ व 7 मुलींचे संघ सहभागी झाले होते हया स्पर्धेत मुलांमध्ये अमरावती म.न.पा. विजयी झाला तर अमरावती ग्रामीण उपविजयी राहीला. मुलींच्या संघामध्ये अमरावती म.न.पा. विजयी राहीला तर यवतमाळ चा संघ उपविजयी राहीला.
दि. 6 सप्टेंबर 16 ला 19 वर्षाआतील मुले व मुलींच्या स्पर्धा झाल्या या स्पर्धेमध्ये मुलांचे 6 संघ व मुलींचे 3 संघ सहभागी होते. हया स्पर्धेत मुलांमध्ये अमरावती म.न.पा. विजयी झाला तर अमरावती ग्रामीण उपविजयी राहिला. मुलींच्या स्पर्धेत अमरावती म.न.पा. विजयी झाला तर उपविजयी यवतमाळ संघ राहिला. या तिनही दिवसांचा स्पर्धेत जवळपास 450 खेळांडूचा सहभाग राहिला. हया स्पर्धेसाठी येणारे खेळाडू त्यांचे प्रशिक्षक , व्यवस्थापक, शिक्षक या सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री समर्थ शिक्षण संस्था तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंगरूळकर मॅडम, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच श्री समर्थ विद्यालयातील क्रीडा समितीचे श्री दिनेश देशमुख, श्री सचिन देवळे, श्री अशोक इडपाचे, श्री. हेमंत लोखंडे, सौ. प्रिती गोसावी, कु. सुप्रिया राह्त व दिलीप वाठ बास्केट बॉल प्रशिक्षक यांच्या अथक परिश्रमाने स्पर्धा आनंदात व उत्साहात पार पडल्या. हया स्पर्धा यशस्वीरीत्या उत्साहात व आनंदात श्री समर्थ विद्यालयाच्या बास्केट बॉल खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले. त्या सर्व खेळाडूंचे आभार.
हया स्पर्धेमध्ये आपल्या श्री समर्थ विद्यालयाच्या चार संघांनी भाग घेतला होता यात 14 वर्षाआत मुले व मुली विजयी 17 वर्षाआतील मुली विजयी झाल्या व 17 वर्षाआतील मुलांचा संघ उपविजयी झाला. या सर्व विजयी संघाचे अभिनंदन.