नियोजित अष्टदशकपूर्ती आनंद सोहळा २०१६ - ( मुख्य कार्यक्रम दि. २१ ते २७ डिसेंबर २०१६ )
श्री समर्थ शाळेच्या स्थापनेला ८० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या वर्षी अष्टदशकपूर्ती आनंद सोहळा साजरा करण्याचे व्यवस्थापन मंडळाने ठरविले आहे.दि.२१ ते २७ डिसेंबर २०१६ दरम्यान अष्टदशकपूर्ती चा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यातील ७ दिवसांपैकी ३ दिवस आजी विद्यार्थी व शिक्षकांना कलागुण सादरीकरण तथा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तथा १ दिवस आनंद मेळाव्यासाठी अशी कार्यक्रमाची विभागणी करण्याचे प्रस्तावित आहे. सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. या साठी आयोजन समितीचे गठन करण्यात आले असून समितीच्या बैठकीही सुरू झाल्या आहेत. या सोहळ्यात समर्थ विालयाच्या आजी- माजी विद्यार्थी, तथा शिक्षक व पालकांनी तन,मन, धनाने सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीमार्फत करण्यात आले आहे. अष्टदशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने खालील गोष्टी करण्याचा निर्णय व्यवस्थापक मंडळाने घेतला आहे.
१६ जुलै- वृक्षारोपणाने आनंद सोहळ्याचे उद्घाटन (शालेय परिसरात ८० झाडे लावण्याचा मानस)
जुलै ते नोव्हेंबर भव्य विविध स्पर्धांचे आयोजन
१. निबंध स्पर्धा
२. चित्रकला स्पर्धा
३. बास्केटबॉल स्पर्धा
४. बुद्धिबळ स्पर्धा
५. वक्तृत्व स्पर्धा
६. मॅरेथॉन स्पर्धा
२१ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०१६- सांस्कृतिक कार्यक्रम - (अधिक तपशिलाने कार्यक्रमाची रूपरेषा नंतर जाहीर करण्यात येईल.)
शालेय गणवेशात बदल
गत ८० वर्षापासून वर्षानुवर्ष चालत आलेला शालेय गणवेश बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बदलत्या काळानुसार गणवेश असावा व पालकांना परवडणारा देखील असावा ही काळजी घेण्यात आली आहे. वर्ग ५ ते १० च्या विार्थ्यांसाठी लालसर कथ्था टॉप, काळसर सलवार, काळे जॅकेट आणि पांढरे सॉक्स व काळ्या बेलीज असा गणवेश ठरविण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांसाठी मुद्रांकीत (छापील ) वह्या
नवनीत प्रकाशन आणि श्री समर्थ विालयाच्या संयुक्त विमाने यावर्षी समर्थ विालयातील विद्यार्थ्यांना बाजारभावांपेक्षा माफक दरात शाळेने नाव छापलेल्या दर्जेदार वह्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सत्र २०१६-१७ सत्रासाठीच्या वह्या विद्यार्थ्यांना २६ जून रोजी शाळा उघडण्याच्या दिवसापासून उपलब्ध होतील.
अष्टदशकपूर्ती आनंद सोहळा आयोजन समिती
१) श्री समर्थ शिक्षण संस्था कार्यकारिणी
२) मुख्याध्यापिका, सर्व पदाधिकारी व शिक्षक
३) पालक प्रतिनिधी
श्री.शिवराय कुळकर्णी श्री.शिवहरी रा. भोम्बे
सौ.मिनाक्षी सतीशराव उदावंत श्री.दिलीप गुलाबराव करडे
सौ.रूपाली कैलास देशमुख श्री. राजेंद्र श्रीरामजी पुनसे
सौ. मंगला गजानन अस्वार श्री.संदीप सा.राऊत
सौ. नीता प्रवीण दातिर श्री.सुधीर नी.झोडे
सौ. प्रज्ञा शाम सराफ सौ. सीमा मा.खडसे
श्री.राजेश वामनराव मालोदे सौ.वैशाली वि.कोरे
श्री.रणजित मा. जाधव आणि आजी-माजी विार्थी परिवार संघ
अष्टदशकपूर्ती आनंद सोहळ्यानिमित्त आवाहन
अष्टदशकपूर्ती आनंद सोहळ्या करिता दानराशी स्विकारल्या जात आहे. हितचिंतक आपली दानराशी स्टेट बँक ऑफ इंडिया, नवाथे शाखा, बडनेरा रोड,अमरावती येथे ‘ अष्टदशकपूर्ती आनंद सोहळा‘
खाते क्र. ३५७२९५९३९४६ , IFSC Code :- SBIN0017754, MICR Code :- 444002113 या खात्यामध्ये थेट जमा करू शकतात.
आमचे आगामी संकल्प
१. खूले रंगमंच/ इन्डोअर स्टेडीयम तथा सभागृह
२. दृकश्राव्य वर्गखोली (डिजीटल क्लास रूम)
३. वर्ग ५ ते १२ साठी एकत्रित शाळा त्यासाठी नवीन ८ वर्गखोल्यांचे बांधकाम
४. शाळेसमोरील पटांगणात पेव्हींग ब्लॉक्स बसविणे.
५. बडनेरा रोडच्या बाजूने भिंतीचे बांधकाम.
६. बालवाडी,प्राथमिक शाळेचे १ ते ४ वर्ग सुरू करणे.
७. अष्टदशमपूर्ती निमित्त ८० झाडांचे ट्री गार्ड सह वृक्षारोपण.
८. विद्यार्थी सहकारी भांडार.
९. रेन वॉटर हारर्वेस्टींग.