अष्टदशकपूर्ती आनंद सोहळा 2016
भव्य चित्रकला स्पर्धा
दिनांकः-23 जुलै 2016
अहवाल
सत्र 2016-17 हेᅠ वर्ष अष्टदशकपूर्ती सोहळा म्हणून साजरेᅠ करण्याचे ठरविले असल्यामूळे संस्थेने विविध स्पर्धांची मेजवाणी विद्यार्थ्यांसाठी ठेवली आहे. त्यातीलच प्रथम स्पर्धा म्हणजे भव्य चित्रकला स्पर्धा होय. ही स्पर्धा शाळेतीलच वर्ग 5 ते 10 विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली. हया स्पर्धेमध्ये तीन गट पाडण्यात आले होते.
- वर्ग 5 वा अ गट रंगभरण स्पर्धा
- वर्ग 6 व 7 ब गट चित्रकला स्पर्धा
- वर्ग 8 ते 10 क गट चित्रकला स्पर्धा
वर्ग 5 वी चे विद्यार्थी नविन प्रवेश घेतलेले व लहान असल्यामूळे त्यांच्यासाठी चित्र रंगविणे म्हणजेच रंगभरण स्पर्धा ठेवलेली होती.
वर्ग 6 व 7 साठी फुगेवाला व मुले, सर्कस व आवडता खेळ हेᅠ विषय ठेवण्यात आले होते.
वर्ग 8 ते 10 साठी रस्ता अपघात, स्वच्छता अभियान व वृक्षारोपण हेᅠ विषय ठेवण्यात आले होते.
ही स्पर्धा 23 जुलै 2016 शनिवार रोजी घेण्याचे ठरले. स्पर्धा एकाच दिवशी दोन्ही विभागात घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत अतिशय उत्साहाने भाग घेतला मनातील कल्पना कागदावर रेखाटण्यात विद्यार्थी तल्लीन झाले होते. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या विषयाची सूचना अगोदरच दिल्यामूळे स्पर्धेची पूर्ण तयारी विद्यार्थ्यांनी केली होती. स्पर्धेबाबतचे माहितीपत्रक विद्यार्थ्यांना चार ते पाच दिवस अगोदरच देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी त्यावरील कूपनवर आपले नाव लिहून व वर्गशिक्षकांजवळ फी भरुन नाव निश्चित केले.
स्पर्धेमध्ये वर्ग 5 ते 7 मधून 780 विद्यार्थ्यांपैकी 688 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व वर्ग 8 ते 10 मधून 779 विद्यार्थ्यापैकी 664 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. प्रत्येक वर्गखोलीत स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धा सुरु असतांनाच श्री समर्थ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.पुरोहित सर व सचिव मा.श्री.बोधनकर सरांनी विद्यार्थ्यांचे चित्र पाहिले व भरभरुन कौतुक केले.
चित्रकला स्पर्धेतील चित्रांच्या परीक्षणाचे काम मा. मुख्याध्यापिकांच्या सूचनेनुसार मा.श्री.सुभाष वर्मा, मा.श्री.सुधाकरराव शिंदे व मा.सौ.मंजिरी पाठक यांना देण्यात आले व अत्यंत उत्तम रितीने त्यांनी परीक्षणाचे काम पार पाडले.
चित्रकला स्प्र्धेसाठी खालील प्रमाणे बक्षिसे जाहीर करण्यात आली होती.
वर्ग 5 वा -
- प्रथम क्रमांक - 500 रु.
- व्दितीय क्रमांक - 300 रु.
- तृतीय क्रमांक - 200 रु.
वर्ग 6 व 7 -
- प्रथम क्रमांक - 700 रु.
- व्दितीय क्रमांक - 400 रु.
- तृतीय क्रमांक - 250 रु.
वर्ग 8 व 10 -
- प्रथम क्रमांक - 700 रु.
- व्दितीय क्रमांक - 400 रु.
- तृतीय क्रमांक - 250 रु.
स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे पूढीलप्रमाणे
वर्ग 5 वा - रंगभरण स्पर्धा
- प्रथम क्रमांक - क्रिष्णा गोपाल पंडीत ( वर्ग 5 ई)
- व्दितीय क्रमांक - कु. शरयु दामोदर भेरडेᅠ ( वर्ग 5 अ)
- तृतीय क्रमांक - कु. रिधिमा भूषण पथे ( वर्ग 5 अ)
वर्ग 6 व 7 - चित्रकला स्पर्धा
- प्रथम क्रमांक - कु. अनुजा प्रविण हिरुळकर (वर्ग 7 वा ड)
- व्दितीय क्रमांक - कु. विधीना किशोर बनसोड (वर्ग 7 वा ई)
- तृतीय क्रमांक - चि. अमन सुधाकर पवार (वर्ग 7 वा अ)
वर्ग 8 व 10 - चित्रकला स्पर्धा
- प्रथम क्रमांक - कु. गौतमी गणेश मेश्राम (वर्ग 9 वा अ)
- व्दितीय क्रमांक - कु. अभिरुची आशिष कोरडे (वर्ग 9 वा अ)
- तृतीय क्रमांक - कु. अवंतिका नरें काळे (वर्ग 9 वा ब)
स्पर्धा राबविण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.मंगरुळकर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपमुख्याध्यापक श्री.फाले सर, पर्यवेक्षिका सौ.काळेᅠमॅडम व सौ.कारणकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली.