समर्थ विद्यालयात शिक्षकांनी घेतली साक्षरता व स्वच्छता प्रसाराची शपथ
अमरावती दि. ११
स्थानिक शिक्षण क्षेत्रात सुप्रसिद्ध असलेल्या श्री समर्थ विद्यालयात ८ सप्टेंबर साक्षरता दिनानिमित्य साक्षरता अभियान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले याचसोबत १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान केन्द्रसरकारच्या परीपत्रकानुसार स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.
विद्यार्थी शाळेत नसल्याने विद्यार्थ्यांना साक्षरतेचे महत्व समजावे तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मदतीने समाजात साक्षरतेप्रति तसेच स्वच्छतेप्रति जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आज दि. ११ सप्टेंबर रोजी मुख्याध्यापक श्री . धनंजय पाठक यांनी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना स्वच्छता पालनाची शपथ दिली.यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. सचिन देवळे, पर्यवेक्षकव्दय श्री. पंकज देशपांडे, श्री छगन आठवले यांच्यासह शाळेचा संपुर्ण स्टाफ कोरोना निमयांचे काटेकोर पालन करीत उपस्थित होता.
साक्षरता अभियान सप्ताह व स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत वर्ग ५ व ६ च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, वर्ग ७ साठी रांगोळी स्पर्धा, वर्ग ८ साठी भित्तीपत्रक व घोषवाक्य स्पर्धा, वर्ग ९ साठी निबंध स्पर्धा तसेच वर्ग १० साठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या सर्व स्पर्धांसाठी साक्षरता व स्वच्छतेशी अनुषंगिक विषय देण्यात आले आहेत.शाळेचे सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता या विषयावर ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहें.
शाळेचा सर्व परिसर व वर्गखोल्यांची स्वच्छता स्वहस्ते करण्याचा संकल्प शालेय प्रशासन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला आहे. साक्षरता व स्वच्छता अभियानाचा प्रचार व प्रसार करण्याची शपथ सर्वांनी घेतली असून तसा निर्धार व्यक्त केला आहे.शाळेचे मुख्याध्यापक श्री . धनंजय पाठक व उपमुख्याध्यापक श्री सचिन देवळे यांच्या मार्गदर्शनात व पर्यवेक्षक श्री.पंकज देशपांडे श्री. छगन आठवले यांच्या नेतृत्वात शाळेच्या सांस्कृतिक समितीचे प्रमुख डाॅ. राजेन्द्र राऊत व सौ. सीमा पेलागडे, स्वच्छता समिती प्रमुख सौ. वैशाली मिटकरी व श्री. प्रशांत उज्जैनकर व श्री. मनोहर डोंगरे श्री. चित्रकला समिती प्रमुख सौ. सुनिता काटोले, कु निशा येवतकर व सौ. घुरडे , लेखन समिती प्रमुख सौ. वैशाली मुगल, वक्तृत्व समिती प्रमुख श्रीमती बापट , प्रसिद्धी समितीचे श्री पुरुषोत्तम जिचकार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी साक्षरता सप्ताह ल स्वच्छता पंधरवाड्याच्या यशस्वितेसाठी झटत आहेत.विद्यार्थ्यांना स्पर्धा व कार्यक्रमाच्या माध्यमातून अंशत: साक्षरता व स्वच्छता प्रचार व प्रसार कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येत आहे. आज झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सभेत शाळेतर्फे राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.