Warning: count(): Parameter must be an array or an object that implements Countable in /home/shrisama/public_html/libraries/cms/application/cms.php on line 460
नूतन वर्षाभिनंदन !
Print

श्री समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी, शिक्षक , कर्मचारी वर्गाचे श्री समर्थ शिक्षण संस्थेतर्फे मन:पूर्वक आभार !

सत्र २०१६-१७ हे वर्ष अष्टदशकपूर्ती आनंद सोहळा वर्ष म्हणून आपण साजरे केले . दि . २१ ते २७ डिसेबर २०१६ दरम्यान माजी विद्यार्थी मेळावा, भरगच्च व्यावसायिक कार्यकम तसेच अष्टदशकपूर्ती आनंद सोहळ्याचा समापन समारंभ थाटात संपन्न झाला .

वेबसाईट , मोबाईल , WhatsApp ह्या आधुनिक संपर्क माध्यमाव्दारे आपण विद्यालयाशी पुनःश्च जोडले गेलो ही अत्यंत आनंदाची बाब आहे .

विद्यालयाच्या प्रगती करिता आपणाकडून भरघोस आर्थिक मदत प्राप्त झाली . आर्थिक मदतीचा हा स्त्रोत मागील वर्षी अखंड होता . त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहे .

गत वर्षी सुरु झालेला हा झरा कायम रहावा . अफाट आधुनिकीकरणाच्या लाटेत आपली शाळा, संस्कार चिरकाल टिकावी ह्या करीता आपल्या सहकार्याची विद्यालयाला, संस्थेला गरज आहे.

आपण ही आपल्या संपर्कात येणाऱ्या माजी विद्यार्थी, शिक्षक ह्यांना ह्या प्रवाहात सामिल करून घेण्याची विनंती करावी .

आपले सहकार्य हे इतरां करिता प्रेरणादायी ठरणार आहे. करिता आपण मदतीचा हा स्त्रोत कायम ठेवावा. ह्या यज्ञात विद्यालयाच्या जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांचा सहभाग व्हावा ही विनंती .

आपल्या मदतीच्या अपेक्षेत ……………………….

 

मुख्याध्यापिका

श्री समर्थ विद्यालय , अमरावती

अध्यक्ष / सचिव

श्री समर्थ शिक्षण संस्था , अमरावती