Print

 

श्री समर्थ शिक्षण संस्था व्दारा संचालीत श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अष्टदशकपूर्ती आनंद सोहळा २०१६ साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्य १७ वर्षाआतिल मुले व मुलींच्या भव्य बुध्दीबळ स्पर्धा दि. ६ व ७ डिसेंबर २०१६ रोजी श्री समर्थ विद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या.

हया स्पर्धेत ४० विद्यालयातील २१६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. हया स्पर्धेचे उद्‌घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनोद कोलवाडकर यांच्या हस्ते दि. ०६ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ११ वाजता झाले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापिका सौ. मंगस्र्ळकर मॅडम, उपमुख्याध्यापक श्री फाले सर, पर्यवेक्षिका सौ कारणकर मॅडम उपस्थित होत्या. सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमाचे पूजन झाले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. मा. मुख्याध्यापिका सौ. मंगस्र्ळकर मॅडम यांनी प्रास्तविकेत शाळेच्या उन्नतीचा आलेख सादर करू न खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. उद्‌घाटन प्रसंगी डॉ. विनोद कोलवाडकर सरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत खेळाल तर वाचाल असा संदेश दिला. अश्या उद्‌घाटन कार्यक्रम झाल्यानंतर स्पर्धेला सुरू वात झाली.

स्पर्धेचे ९ राऊंड झाले. हया स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रेम यादव ज्ञानमाता हायस्कुल व्दितीय क्रमांक युवराज हेडा सामरा हायस्कुल, तृत्तीय क्रमांक सेंट फ्रांन्सीस हायस्कूल मधिल कुणाल शर्मा या खेळाडूंचा आला अंजली पवार सेंट थॉमस हायस्कूल, हर्षित अग्रवाल भ. सामरा हायस्कूल, आचल भंडारी भ. सामरा हायस्कूल यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहे. हया स्पर्धेत सर्वसहभागी खेळाडूंना सहभागचे प्रमाणपत्र देण्यात आले.

हया स्पर्धेचे पंच म्हणून शैलश पोहेकर , निनाद सराफ, सौ. देशमूख , श्री घोटकर, सर यांनी कार्य केले तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री समर्थ विद्यालयातील शिक्षक वृंद श्री दिनेश देशमुख, श्री सचिन देवळे, श्री अशोक इडपाचे, श्री. हेमंत लोखंडे, श्री जाधव, सौ. गोसावी, सौ. अवघड, सौ. राऊ त यांनी परीश्रम घेतले. या स्पर्धेचा बक्षिस समारंभ २७ डिसेंबर २०१६ रोजी करण्यात येणार आहे. असे बक्षिस विजेत्यांना कळविण्यात आले. अशाप्रकारे सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊ न स्पर्धा यशस्वी केली.