Print

शालेय  बास्केट बॉल स्पर्धेत शाळेतील वयोगट १४ व १७ वर्षाआतील मुला मुलींचा संघ राज्यस्तरावर. वाशीम येथे झालेल्या विभागीय स्तरावर तिन्ही संघानी दिमाखदार खेळ सादर करून राज्यस्तरावर  आपले  स्थान निश्चित केले. राज्यस्तरीय स्पर्धा जिल्हा कोल्हापूर वारणानगर येथे झाली. या स्पर्धेत  वयोगट १४ वर्ष मुली यात श्रिया चिखलकर, पालक काळे, वैष्णवी कोरडे,श्रावणी रोडे, स्वराली चाटी, गौरी तावरे, नंदिनी गायकवाड,गौरी बोंडे, शरयू मोहोड, वैभवी वानखडे, पूर्वा टपके तसेच वयोगट १४ वर्ष मुलांमध्ये वेदांत हिरुळकर, आयुष इंगोले, अजिंक्य नवाथे, हर्षल विल्हेकर, स्मित वानखडे, पूर्वार्ध बानोरे,एकवीर वाडकर, धीरज चव्हाण, रोशण इडपाचे, आनंद भारती, श्रेयस पानट, विनय राऊत, तर वयोगट १७ वर्षा आतील मुलींच्या संघात युक्त कुबेर, श्रेया गणेशकर, आकांशा खडसे, वैष्णवी गुळकरी, अमरजा कुलकळणी, अश्विनी कळसकर, भवन पवार, स्मितल मानकर, एकता टावरी, सानिका सूर्यवंशी, सिद्धी बोदडे, तन्वी कान्हेरकर हे खेळाडू संघात सहभागी होते.  विजयी संघाला मार्गदर्शन श्री दिलीप वाठ , श्री लोखंडे ,श्री  देशमुख , श्री देवळे , यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कोलवाडकर, सचिव डॉ. बोधनकर, शाळेचे मुख्याध्यापिका सौ. मंगरूळकर, उपमुख्याध्यापक श्री. फाले, पर्यवेक्षिका सौ. काळे, सौ. कारणकर, यांनी अभिनंदन केले .